अंजाळे घाटात बस-ट्रकच्या अपघातात पाच जण जखमी

anjala ghat

भुसावळ प्रतिनिधी । अंजाळे घाटात बसने समोरून येत असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले तर सुदैवाने अन्य प्रवासी सुखरूप बचावले. गुरूवारी सकाळी 9.20 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान आज सकाळी अपघातानंतर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. भुसावळ आगाराची भुसावळ-हिंगोणा बस (एम.एच.14 बी.टी.0442) ही हिंगोण्याकडे निघाली असतानाच अंजाळे घाट उतरत असताना समोरून येणारा ट्रक (जी.जे.एक्स.5862) ला बसने धडक दिल्याने बसचा वाहक साईडचा पुढील भागातील पत्रा मोठ्या प्रमाणात फाटला तर या अपघातात चार प्रवासी जखमी झाले.

यामध्ये भालोद येथील एक महिला,भुसावळ मधील एक पुरुष तर निबोल एनपूर मधील एक पुरुष असे तीन जण गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये भुसावळ मधील प्रवाशी खाजगी दवाखान्यात डॉ.तुषार पाटील यांच्याकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.अपघात झाल्या ठिकाणी दुचारी वरून जाणारे चंद्रकांत लालजी वायकोळे व ज्ञानेश्वर मोहन महाजन राहणार यावल तालुक्यातील पिळोदा गावातील असून यांनी अपघात झाला वेळीस बस मधील जखमींना काढून सहकार्य केले. घटना घडल्यानंतर बस चालक प्रवाशांना वाऱ्यावर सोडून फरार झाले. महिला कंडाक्टर असल्याने ती बसमध्ये थांबलेली होती.

घाटावरच झालेल्या अपघातामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अपघातानंतर जखमींसह प्रवाशांना अन्य बसने हलवण्यात आले. अपघातानंतर यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्र पाळधीचे सपोनि गुलाब मोर, पो.कॉ. अनिल सपकाळे, पोकॉ पंकज बडगुजर, पोना मिलिंद सोनवणे, पोकॉ प्रदिप रनित यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच क्रेनद्वारे अपघातग्रस्त वाहने हलवली. यावल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

Protected Content