भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? : प्रियंका

PRIYANKA GANDHI

नवी दिल्ली । काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा केली आहे.

जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अद्यापही घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यावरुन प्रियंका गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय बंदिस्त करण्यात आलं आलं आहे. लाखो लोकंही तिथं अडकली आहेत. सहा महिन्यांपूर्वी आम्ही हे सगळं किती दिवस चालणार हे विचारत होतो ? आता आम्ही आपण अद्याप देशात लोकशाही आहे की नाही अशी विचारणा करत आहोत.

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवले आहे. यावरूनच प्रियंका यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Protected Content