Home क्राईम धनादेश न वटल्याप्रकरणी एकास अटक

धनादेश न वटल्याप्रकरणी एकास अटक


fraud

जळगाव प्रतिनिधी । बँकेचा धनादेश न वटल्याने एकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणातील एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयित संदीप बापुराव देशमुख (वय-२८,रा़ हरिओमनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न वटनार चेक देवून नितीन सोनार यांची फसवणूक झाली होती. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी संशयित संदीप देशमुख याला सोमवारी शनिपेठ पोलिसांनी अटक केली़ ही कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक पवार, प्रशांत देशमुख, रवींद्र भारंबे यांनी केली आहे.


Protected Content

Play sound