Home क्राईम छेड काढून धमकावणार्‍याविरूध्द गुन्हा

छेड काढून धमकावणार्‍याविरूध्द गुन्हा

0
45
FIR

जळगाव । शहरातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला धमकावल्यावरून तरूणाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ही तरुणी असून तिच्याच गावात राहणारा अनिल मंगल सपकाळे (वय २६) याने या मुलीस त्रास देण्यात सुरूयात केली होती. मुलीने ही माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी अनिल याला समजावण्याचा प्रयत्न केला. तरी तो शांत बसला नाही. शनिवारी ही तरुणी बाहेती महाविद्यालयात पायी येत असताना अनिल हा दुचाकीने तिच्या पाठीमागून आला. समोर दुचाकी आडवी लावून थांबवले. यानंतर हात धरून तिची छेड काढली. यानंतर कुटुंबीयांशी बोलून तिने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार अनिल सपकाळे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound