यावल (प्रतिनिधी)। आपल्या पगारवाढीसह इतर मांगण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युनायटेड फोरम बॅक युनियन अंतर्गत देशातील 9 संघटनांनी मिळुन दोन दिवसाचे शुक्रवार आणी शनिवार कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली होती. या संघटने पुकारलेल्या दोन दिवसीय संपामुळे यावल शहरासह तालुक्यातील किनगाव, सावखेडा सिम, फैजपुर, न्हावी, बामणोद येथील स्टेट बँक ऑफ इंडीया आणि सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया आदी राष्ट्रीय बँकांनी या संपात सहभाग घेतल्याने संपुर्ण कामकाज ठप्प झाले आहे.
युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियनच्या माध्यमातुन पुकारण्यात आलेल्या काम बंद आंदोलनात एकत्रीतपणे आपला सहभाग नोंदवला केन्द्रातील नरेन्द्र मोदी सरकार सतेत आल्यापासुन सर्व योजना बँकांच्या माध्यमातुन राबविल्या अगदी खाते उघडणे असो किवां प्रधानमंत्री किसान विमा योजना असो, नोटबंदी असो, कर्ज वाटप योजना असो ही सर्व श्रेय केंद्र सरकारने बँकांच्या जिवावर मिळवले. पण कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रश्न व मागणी गेल्या दोन वर्षापासुन प्रलंबीत का अशी तक्रार बॅकच्या कर्मचारी संघटनेव्दारे करण्यात येत असुन या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेतर्फे पुनश्च काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांचे म्हणणे असुन राष्ट्रीयकृत बँकांच्या या संपामुळे यावल तालुक्यातील सर्व राष्ट्रीय बँकांच्या वतीने शुक्रवार आणी शनीवार हे दोन दिवस बँकांचे कामकाज बंद झाल्याने मुख्य केळी व शेतीच्या व्यवहारावर अवलंबुन असणाऱ्या या तालुक्यातील आर्थिक व्यवहारावर याचा मोठा परिणाम जाणवला.