जळगाव, प्रतिनिधी | येथील महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.उदय टेकाळे आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांना आज (दि.३१) मनपात निरोप देण्यात आला. त्यामुळे आता आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे देण्यात आला आहे.
डॉ. टेकाळे हे गेले ११ महिने जळगाव महापालिकेचे आयुक्त होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांची जळगाव येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्या आधी ते ‘स्वच्छ महाराष्ट्र राज्य अभियाना’चे संचालक होते. डॉ. टेकाळे यांच्या निवृत्तीमुळे त्यांचा पदभार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे देण्यात यावा, असे पत्र राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अनीश परशुरामे यांनी दिले आहे.