Home Cities भुसावळ भुसावळच्या साईबाबा मंदिरात महाप्रसाद उत्साहात

भुसावळच्या साईबाबा मंदिरात महाप्रसाद उत्साहात

0
33

भुसावळ प्रतिनिधी । येथील साईबाबा मंदिरात वसंत पंचमीचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

वसंत पंचमीनिमीत्त गुरुवारी येथील साईबाबा मंदीरात अभिषेक, पूजा, आरती होऊन भंडार्‍याचा कार्यक्रम झाला. यासाठी तब्बल ५५ क्विंटल गव्हाची बट्टी, वांगे १०० पोते, शिरा (प्रसाद) २१०० क्विंटल असे नियोजन होते. नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसादाला आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरातही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या वेळी मंदिरांतर्फे स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती.


Protected Content

Play sound