धरणगाव प्रतिनिधी । येथील पोलीस स्थानकासमोर लागलेल्या आगीत घर जळून खाक झाल्याची घटना रात्री घडली.
याबाबत वृत्त असे की, शहरातील पोलीस स्थानकाच्या समोर असणार्या घराला रात्री आग लागली. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून घरात असणार्या भिकूबाई सोनवणे या महिलेला लागलीच बाहेर काढले. यानंतर नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तथापि, आगीने भडका घेतल्याने या महिलेचे घर खाक झाले आहे.