Home Cities चाळीसगाव ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विवाहबध्द

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विवाहबध्द

0
155

maha kesari

नाशिक प्रतिनिधी । तीनदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे व सध्या पोलीस उपअधिक्षक पदावर कार्यरत विजय चौधरी यांचा विवाह येथील बालाजी लॉन्समध्ये पार पडला.

विजय चौधरी यांचा विवाह सोहळा २९ रोजी नाशिकच्या कोमल भागवत या जलतरणपटूसोबत झाला. विजय चौधरी हे मुळचे चाळीसगाव तालुक्यातील सायगावचे रहिवासी असून त्यांनी २०१४, १५ आणि १६ असे सलग ३ वर्ष महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. त्यांचा विवाह बुधवारी दुपारी नाशिकच्या बालाजी लॉन्समध्ये विवाह पार पडल्यानंतर सायंकाळी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. सोहळ्याला पहिलवान मंडळींसह, नातलग आणि मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Protected Content

Play sound