चोपडा येथे शुक्रवारपासून ‘रोटरी उत्सवा’चे आयोजन

chopda 2

चोपडा, प्रतिनिधी | येथे ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या रोटरी उत्सवाच्या जनजागृती व प्रसिद्धीसाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लबतर्फे रविवारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

या रॅलीला शहरातील गांधी चौकातून सुरवात झाली. तसेच संपूर्ण शहरातून सर्व रोटरी सदस्य तसेच पदाधिकारी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन जैन, सेक्रेटरी धिरज अग्रवाल, रोटरी उत्सव चे चेअरमन नितीन अहिरराव एम डब्ल्यु पाटील सर, आशिषभाई गुजराथी, सहप्रांतपाल व्ही.एस. पाटील, माजी अध्यक्षा पूनम गुजराथी, अविनाश पाटील, रुपेश पाटील, अनिल अग्रवाल, संजीव गुजराथी, प्रसन्न गुजराथी, धीरेंद्र जैन, चेतन टाटीया, नरेंद्र तोतला, पंकज बोरोले, संतोष बाविस्कर, शशिकांत पाटील, प्रवीण मिस्त्री,

विलास कोष्टी, अरुण सपकाळे, एल.एन. पाटील, प्रफुल्ल गुजराथी, सनी सचदेव, विलास पी. पाटील, डॉ. वारके, रमेश वाघजाळे, प्रदीप पाटील, डॉ. प्रफुल्ल पाटील, आशिष जैस्वाल, पी.बी. पाटील, अॅड. अशोक जैन, ईश्वर सौंदनकर, सुनील महाजन, भालचंद्र पवार, राधेश्याम पाटील, गौरव महाले, आरिफ शेख, निखिल सोनवणे, शिरीष पालिवाल, पुष्पजीत सोनवणे, दिलीप जैन, तसेच इनरव्हीलचे सदस्य व रोटरॅक्टर्स मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते.

रॅलीदरम्यान लोकांना रोटरी उत्सवाविषयी माहिती देण्यात आली. चार दिवस चालणाऱ्या या रोटरी उत्सवामध्ये लहान मुलांसाठी झुले, ट्रेन, जॉईंट व्हील तसेच खवैयांसाठी विविध प्रकारचे फूड स्टॉल महिलांच्या खरेदीसाठी स्टॉल तसेच फोरव्हीलर व मोटारसायकलचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. तरी शहरातील सर्व नागरिकांना रोटरी उत्सवात हजेरी लावण्याचे आवाहन रोटरी उत्सवाचे चेअरमन नितीन अहिरराव यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Protected Content