खेडी येथील कार, दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक

Crime news1 1

जळगाव प्रतिनिधी । खेडी शिवारातून कार व दुचाकी चोरणाऱ्या दोन भामट्यांनी एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. दोघांकडून स्विप्ट कार हस्तगत करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

कार-दुचाकीची चोरी
याबाबत माहिती अशी की, 7 डिसेंबर 2019 रोजी खेडी शिवारातील शांताराम पाटील शाळेसमोर स्वप्निल रामचंद्र पवार वय-32 यांनी घरासमोर लावलेली स्विप्ट कार क्रमांक एमएच 19/बीजे 9977 कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 16 जुलै 2019 रोजी या परीसरातील रहिवाशी खेमराज प्रेमचंद जंगले वय-49 यांच्या घरासमोरून हिरो होंडा शाईन एमएच 19/बीएन 5979 दुचाकी अज्ञान चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी केली कारवाई
या दोन्ही गुन्ह्यातील संशयित आरोपी खोजल्या वन्या तडवी वय-25 रा. बिजरी गव्हाण ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार ह.मु. शहादा रोड तळोद आणि संदिप सुनिल ठाकरे वय-19 रा. ख्वॉजा नाईक चौक तळोदा दोघांना अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता दोघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याकामी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अतुल वंजारी, सचिन मुंढे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन चौधरी, मुकेश पाटील यांनी परीश्रम केले.

Protected Content