जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथे नातेवाईकांकडून कार्यक्रमाला गेलल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एकाच गल्लीत तीन ठिकाणी घरफोडी करून कपाटातील दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना शहरातील गायत्रीनगरात आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मनोहर कमलाकर सोनार (वय-48) रा. गायत्री नगर हे भुसावळ येथील नातेवाईकांकडे बारश्याच्या कार्यक्रमासाठी 26 जानेवारी सायंकाळी 6 वाजता घराला कुलूप लावून गेले होतो. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकायंडा तोडून कपाटात ठेवलेले 25 हजार 700 रूपये रोख व 1 हजार रूपये किंमतीचे चांदीचा गणपती व चांदीची वाटी चोरून नेला. त्याच्या घराजवळ राहणाऱ्या सुनिल गंगाभीसन मंडोरा यांच्या घराच्या वरच्या खोलीतून 30 हजार रूपये रोख रक्कम लंपास केली आणि त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे नितीन रमेश राणे यांच्या घराचे कुलूप कापून 6 हजार रूपये रोख व 400 रूपये किंमतीचे चांदीचे जोडवे चोरीस गेले. तीनही घराची चोरीत 63 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांची लंपास केला आहे. याप्रकरणी मनोहर सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय आनंदसिंग पाटील करीत आहे.