अमळनेरच्या न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव आकाशवाणी येथे “न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल ” च्या विद्यार्थ्यांनी बालविश्व या कार्यक्रमांतर्गत “पाणी आडवा पाणी जिरवा” या विषयावर उद्बोधनपर कार्यक्रम सादर केला. त्यात प्रार्थना, नाट्यमय संवाद, मनोगत, समूहगीत, भारुड अशा विविध कला गुणांचा समावेश होता. या कार्यक्रमात लीना पाटील, गुंजन डावरे, श्रावणी कासार, ऐश्वर्या देशमुख, खुशी शेंडे, देवेश न्याहाळदे, योगिता पाटील, रुपेश महाजन, कृतिका पाटील, युगल शिंगणे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर कार्यक्रम 17 फेब्रुवारी रोजी (रविवार) सकाळी 11.30 मिनिटांनी प्रसारित होणार आहे.


या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका निवेदिका सौ. स्नेहा एकतारे व सहाय्यक मार्गदर्शक राजश्री चौधरी यांनी यासाठी परिश्रम घेतले . या कार्यक्रमात विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल अध्यक्ष शितल देशमुख, चेअरमन निलेश लांडगे, उपाध्यक्ष धनराज महाजन, सचिव गोकुळ पाटील, मुख्याध्यापक संदीप महाजन, उपमुख्याध्यापिका माधुरी महाजन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content