जळगाव प्रतिनिधी । माजी उपमहापौर सौ. भारती कैलास सोनवणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी सत्ताधारी भाजपसह विरोधी शिवसेनेचेही सदस्य उपस्थित असल्याने त्यांनी निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याप्रसंगी सेना-भाजप युतीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्याने एकच हशा पिकला.
यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर सिमाताई भोळे, मनपा विरोधी गटनेते सुनिल महाजन, नगरसेविका सुचिता हाडा, नगरसेविका राखीताई सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यासह भाजपा, शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक उपस्थित होते.