रावेर तहसिलदारांनी मध्यरात्री पकडले अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर

raver news 3

रावेर, प्रतिनिधी | तहसिलदार उषाराणी देवगुणे व महसूल विभागाच्या पथकाने मध्यरात्री १.३०च्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर-ट्रॉली पकडले आहेत. यापैकी एक रावेर तहसिल तर दूसरे ट्रॅक्टर-ट्रॉली निंभोरा पोलिस स्टेशन जमा करण्यात आले आहे.

 

या बाबत वृत्त असे की, रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करत असतांना उटखेडा रोड शिक्षक कॉलनी येथे विना नंबरचे एक ट्रॅक्टर पकडले तर
विवरे येथे शाळेजवळ दूसरे ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे. ही कारवाई तहसिलदार देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार सी.जी. पवार, मंडळ अधिकारी सचिन पाटील व तलाठी ईश्वर कोळी, शैलेश झोटे यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content