धनाजीनाना महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

blood camp

blood camp

फैजपूर, प्रतिनिधी | तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजीनाना महाविद्यालयात एच.डी. एफ.सी. बँक रावेर व सावदा शाखा यांच्या सहकार्याने स्वातंत्र्य सेनानी कै. धनाजीनाना चौधरी यांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सण व उत्सव समिती यासोबत प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रक्त संकलनासाठी रेड क्रॉस सोसायटी, जळगाव यांना बोलावण्यात आले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर. चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.आय. भंगाळे, प्रा.डॉ. सतीश चौधरी, प्रा.डॉ.जी.जी. कोल्हे, समन्वयक विद्यार्थी विकास विभाग, प्रा डॉ आय पी ठाकूर, चेअरमन, राष्ट्रीय सण व उत्सव समिती, प्रा.डॉ. शरद बिऱ्हाडे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, एनसीसी अधिकारी प्रा.एस.डी. पाटील, प्रा. विवेकानंद महाजन, प्रा नरेंद्र वाघोदे, प्रा.डॉ. रवी केसुर, प्रा. हरीश नेमाडे यांच्यासोबत एचडीएफसी बँक रावेर व सावदा येथील शाखेचे मुकुंदा तावडे, ऑपरेशन्स मनेजर, नरेंद्र धनगर, डेप्युटी मॅनेजर, चेतन सोनवणे, सेल्स ऑफिसर, सागर तायडे, पी.बी. ऑफिसर, अभिजीत मिटकर, सेल्स ऑफिसर, राहुल तेली ऑपरेशन्स ऑफिसर यांनी सहकार्य केले.

यासोबत रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्यामार्फत डॉ. शंकरलाल सोनवणे, ट्रान्सफ्युजन ऑफिसर, सौ. सुनीता वाघ, सीनियर लॅब टेक्निशियन, सौ. गीतांजली कुवर, सीनियर लॅब टेक्निशियन, सौ. रुपाली बडगुजर, जूनियर लॅब टेक्नीशियन, किरण बाविस्कर, उमाकांत शिंपी यांनी सहकार्य केले. यावेळी एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानसिक समाधानासोबतच गरजू रुग्णाच्या प्राण वाचविण्यासाठी योगदान दिले.

रक्तदान प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळ, फैजपुरचे अध्यक्ष आ. शिरीष चौधरी, व्यवस्थापन मंडळ, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

Protected Content