जळगाव प्रतिनिधी । एसएसबीटीच्या फार्मसी महाविद्यालयास रस्सीखेच स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. जळगाव जिल्हा डी फार्मसी इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल फार्मसी वीक साजरा करण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिमूर्ती फार्मसी कॉलेज यांनी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सर्वच डी फार्मसी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. स्त्री आणि पुरुष गटात झालेल्या पुरुष गटामध्ये एस एस बी टी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. क्रीडा संचालक श्री. जितेंद्र सोनावणे यांनी मुलांचे मार्गदर्शन केले. मुकुल ठाकूर, ललित पाटील, मोह्हमद नावीद, जितेंद्र चिकटे, चेतन मोरे, व्यंकटेश कापडे, राहुल सांगळे, दर्शन चौधरी, संदेश चौधरी, सय्यद फराझ इ. संघाचे खेळाडू होते. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संचालक डॉ के. एस. वाणी, एसएसबीटी सीओइटी चे उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, प्राचार्य डॉ. अमोल द लांडगे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले.