Home Cities यावल राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त फैजपूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त फैजपूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

0
113

 

जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दरवर्षी जिल्हा, विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्र स्तरावर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावर्षीचा जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम फैजपूर येथे साजरा करण्यात येणार आहे.

 

जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम शनिवार, दिनांक 25 जानेवारी, 2020 रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, ऑडोटोरीयम हॉल, न्हावी मार्ग, फैजपूर, ता. यावल येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व शासकीय विभागांचे प्रमुख तसेच मतदार, विद्यार्थी व नागरीकांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


Protected Content

Play sound