प्रभाग १९ “अ’ पोटनिवडणूक : महाविकास आघाडीच्या उमेदवारास भाजपचा पाठींबा

WhatsApp Image 2020 01 21 at 8.40.41 PM

जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेच्या प्रभाग १९ “अ’च्या निवडणूकीसाठी शिवसेनेच्या उमेदवार निता मंगलसिंग सोनवणे यांचा अर्ज दाखल केला. त्यांना महाविकास आघाडी सोबत आता भाजपने पाठींबा दिला आहे. सोनवणे यांच्या अर्ज दाखल करतांना शिवसेना, राष्ट्रवादी, कॉग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांसोबत भाजपच्या पदाधिकारी देखील उपस्थित होते.

जळगाव महापालिकेच्या २०१८ सार्वत्रीक निवडणूकीत प्रभाक क्रमांक १९ “अ’ मधून नगरसेविका म्हणून लता सोनवणे या निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणूकीत चोपडा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी करून त्या विजयी झाल्या. यामुळे त्यांनी नगरसेविका पदाचा राजीनामा दिल्याने १९ “अ’ मधील रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी शिवसेनातर्फे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या भगिनी निता मंगलसिंग सोनवणे यांचा तर अपक्ष म्हणुन आशा किशोर कोळी यांचा अर्ज दाखल झाला आहे.  नीता सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना आमदार लता चंद्रकांत सोनवणे, विरोधीपक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, अण्णा भापसे, नगरसेवक गणेश सोनवणे, माजी महापौर राखी सोनवणे, भाजपाचे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, गटनेते भगत बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, कॉग्रेसचे देवेंद्र पाटील, श्‍याम तायडे, जाकीर बागवान, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, रोहन सोनणे, मंगलसिंग सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content