जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी दिलीप बोरसे यांची निवड (व्हिडिओ)

WhatsApp Image 2020 01 20 at 8.21.05 PM

जळगाव, प्रतिनिधी |  येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी दिलीप बोरसे, उपाध्यक्षपदी अॅड. प्रभाकर पाटील, कोषाध्यक्षपदी सहसचिवपदी अॅड.शरद न्हायदे, सहसचिव अॅड.स्मिता झालटे, सचिवपदी अॅड.दर्शन देशमुख यांची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी आज दि. २० जानेवारीला सकाळी ८ ते ४ यावेळेत बार लायब्ररीत मतदान घेण्यात आले. यापूर्वी कार्यकारिणी सदस्य म्हणून १० सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजेपासून मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून आला. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा वकील संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी मतदान झाले. एकूण ७४२ पैकी ६५२ मतदारांनी मतदान केले. एकूण ८७.८७ टक्के मतदान झाले. संध्याकाळी ४.३० वाजता मतमोजणी सुरू झाली.  अध्यक्षपदासाठी अॅड.दिपकराज खडके, अॅड.किशोर भारंबे, अॅड. दिलीप बोरसे यांच्यात सरळ लढत झाली. अॅड. बोरसे यांना ५२५, अॅड. खडके यांना ११७, अॅड. भारंबे यांना २५ मते मिळाली. अॅड. खडके यांच्यावर अॅड. बोरसे ४०८ मतांनी विजय मिळविला. उपाध्यक्षपदाच्या निवडीत अॅड.प्रभाकर पाटील यांनी सुभाष तायडे यांना हरविले. प्रभाकर पाटील यांना ३६५ तर सुभाष तायडे यांना २७५ मते पडली.यात अॅड. प्रभाकर पाटील यांनी विजय मिळविला. सहसचिव पदासाठी अॅड. चेतना कलाल, अॅड.स्मिता झालटे, अॅड.मंजुळा मुंदडा, अॅड.प्रतिभा पाटील यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीपासून अॅड.स्मिता झालटे ह्या पुढे होत्या. अखेर १० व्या फेरीनंतर त्यांनी ११४ मतांचा लीड घेऊन दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार अॅड.प्रतिभा पाटील ह्यांच्यावर विजय मिळविला. अॅड.स्मिता झालटे यांना २९५ मते मिळाली. अॅड.प्रतिभा पाटील यांना १८२ तर अॅड. चेतना कलाल यांना ८९ तर अॅड. मंजुळा मुंदडा यांना ८२ इतकी मते मिळाली. तसेच कोषाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड.शरद न्हायदे आणि अॅड. संजय रूणवाल यांच्यात सरळ लढत झाली. यात पहिल्या फेरीगणिक विक्रमी मते घेत अॅड. न्हायदे यांना ५१३ तर अॅड. रूणवाल यांना १३७ मिळाली आहेत. अॅड. न्हायदे यांनी ३७६ इतक्या मतांनी विजय मिळविला. ६५२ मतांपैकी २ मते बाद झालीत. सचिवपदासाठी अॅड.दर्शन देशमुख यांनी अॅड. नत्थु पाटील यांचा पराभव केला.यात अॅड. दर्शन देशमुख यांना ३९० तर अॅड.नत्थु पाटील यांना २६० मते प्राप्त झाली.मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.आर. एन. पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड.ए.आर.सरोदे, अॅड.शिरीन अमरेलीवाला यांनी काम पाहिले.निवडणूकीसाठी सहाय्यक म्हणून अॅड.जयंत कुरकुरे, अॅड. श्रीकृष्ण निकम, अॅड. विरेन्द्र पाटील, अॅड. अरविन्द शुक्ला,अॅड. अमोल बारी, अॅड. संदीप पाटील, अॅड.चंद्रशेखर निकुंभ यांनी काम पाहिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/150404949729521/

Protected Content