भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी आज नितीन धांडे यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
नितीन धांडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली. आज माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ.सतिश पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा निरीक्षक करण खलाटे, जिल्हाध्यक्ष-ओबिसी सेल उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रविंद्रनाना पाटील व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,जि.प सदस्य रोहन पाटील,यावल तालुकाध्यक्ष मुकेश येवले आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.