Home राजकीय राष्ट्रवादी व मनसेच्या सोबतीचे संकेत

राष्ट्रवादी व मनसेच्या सोबतीचे संकेत

0
46

मुंबई प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज चर्चा झाल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीचे नवीन पर्व सुरू होण्याचे संकेत आहेत.

अजित पवार यांनी अलीकडच्या काळात अनेकदा मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्‍वभूमिवर आज पवार यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. विवेक जाधव यांच्या निवासस्थानी ही चर्चा झाली. या चर्चेतील तपशील बाहेर आला नसला तरी आगामी निवडणुकीत मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रीतपणे निवडणुकीस सामोरे जावे याबाबत गुफ्तगू झाल्याचे कळते. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound