यावल, प्रतिनिधी | दुचाकीवरून प्रवास करतांना अपघातात होऊन एका तरुणाला आपला प्राण गमवावे लागले होते. त्याच्याकडे हेल्मेट असतांना त्याने ते दुर्दैवाने घातले नव्हते. आपल्या मित्रासारखी दुर्द्वी घटना पुन्हा घडू नये म्हणून या तरुणाच्या मित्रांने दुचाकीस्वारांना आज हेल्मेटचे मोफत वाटप केले.
शुभम वाणी यांच्या एका मित्राला ५ महिन्यापूर्वी दुचाकीचा अपघातात प्राण गमवावे लागले होते. जर त्याने हेल्मेटचा वापर केला असता तर त्याचे प्राण वाचू शकले असते याची जाणीव ठेऊन शुभम याने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेल्मेट वाटप करण्याचा उपक्रम राबविला. त्याने त्याच्या मित्रांच्या हस्ते आज ४५ दुचाकीस्वरांना निःशुल्क हेल्मेटचे वाटप केले. जेणे करून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही. यातून त्याने हेल्मेट वापरण्याचा सामाजिक संदेश दिला आहे. शुभम याने सर्वानी दुचाकीवरून प्रवास करतांना हेल्मेटचा उपयोग करावा असे आवाहन यावेळी केले आहे.