Home राज्य प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरून पडून मृत्यू

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरून पडून मृत्यू


shendi
 

अहमदनगर (वृत्तसंस्था) कोकण कड्यावरुन पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू झाला आहे. सावंत हे शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपासून बेपत्ता झाले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला.

 

अरुण सावंत आणि इतर गिर्यारोहकांची टीम असे एकुण 30 जण हरिश्चंद्र गडावर रँपलींगसाठी आले होते. हरिश्चंद्र गडाचा कोकण कडा ते माकड नाळ या हरिश्चंद्र गडावर गडाचाच एक भाग असलेल्या कड्यापर्यंत त्यांची टीम आधी वरुन खाली आणि त्यानंतर आडवं रँपलींग करणार होते. रँपलींगचा पहिला टप्पा जवळपास पुर्ण होत आला होता. अरुण सावंतांसोबत असलेले 29 जण पहिला टप्पा उतरून आले होते. सर्वात शेवटी अरुण सावंत दोरीचा सहाय्याने रँपलींग करत असताना सायंकाळी पाच वाजता नाहीसे झाले. रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह सापडला आहे.


Protected Content

Play sound