रावेर, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतली महत्वपूर्ण योजना पीएम किसानच्या अमलबजावणी करतांना समस्या सुटता-सूटेना झाले आहे. डिसेंबर २०१८ ला सुरु झालेल्या या योजनेला जानेवारी २०२० उजाळले तरी सुध्दा ही योजनेस अपेक्षित गती मिळालेली नाही. संथगतीने सुरुअसलेल्या कामकाजासंदर्भात तहसिल कार्यालयात तलाठ्याच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत.
याबाबत वृत्त असे की, १ डिसेंबर २०१८ पासुन सुरु झालेली प्रधामंत्री किसान सम्मान योजना संदर्भात रावेर तहसिल कार्यालयात तहसिलदार उषाराणी देवगुणे तालुक्यातील तलाठ्या सोबत मॅरेथॉन बैठका घेत आहे. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे अजुन सुध्दा या योजनेचा लाभ मिळालेला नाही. लवकरात-लवकर या योजने संदर्भात येणा-या तृटी तालुक्यातील शेतक-यानी तलाठ्याकडे दुरुस्त करण्याचे अवाहन तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.
योजने संदर्भातील समस्या
प्रधामंत्री किसान सम्मान योजने संदर्भात अनेक शेतक-यांची आधार कार्ड वरील चुकलेले नावे आहे, बँक अकाउंटचा चुकलेला नंबर, आयएएफसीचा चुकलेला कोड या कारणांमुळे योजनेचा लाभ शेतक-यांना देण्यात अडचणी येत आहे. आतापर्यंत तालुक्यातील ४१ टक्के टक्के शेतकऱ्यांच्या बँक समस्या संदर्भात तर ४९% टक्के शेतक-यांची आधार संदर्भात समस्या सोडल्या आहे. शेतकऱ्यांमधून संथगती सुरु असलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.