दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा आवश्यक : मोहन भागवत

mohan bhagvat

 

मुरादाबाद (वृत्तसंस्था) देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणे आवश्यक आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल्याचे वृत्त आहे.

 

एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातले दिलेल्या वृत्तानुसार सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा. अशा प्रकारच्या कायदा आणल्यास लोकसंख्या नियंत्रणात येईल असेही मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता देशात दोन मुलं जन्माला घालण्याच्या कायद्यासाठी आग्रही असेल. तसेच देशात यासंबंधी जनजागृती मोहीम राबवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content