यावल महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात

yaval sc

यावल प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला मंडळातर्फे पत्रलेखन, वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

पत्रलेखन स्पर्धेत अनघा भारी, रीना पारधे व पूजा बैरागी यांनी अनुक्रमे यश प्राप्त केले. ‘स्वामी विवेकानंदाचे जीवन व कार्य’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम पूजा बैरागी, द्वितीय रीना पारधे व तृतीय निकिता चौधरी यांनी क्रमांक प्राप्त केले. ‘असा असावा देश माझा’ या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आले.

या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार होते. या स्पर्धेत दर्शना पाटील, महेश अहिरे व कोमल बोरनारे या अनुक्रमे यशस्वी झाल्या. परीक्षक म्हणून डॉ.सुधा खराटे, प्रा.ए.एस.अहिरराव, प्रा.राजू पावरा यांनी काम केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कला मंडळ प्रमुख डॉ.एस.पी. कापडे, प्रा.राजू तडवी, उपप्राचार्य ए. पी. पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content