मुंबई प्रतिनिधी । आर्थिक सहमती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने बँकांना दुर्गम भागात बँकिंग सेवा देण्याचे निर्देश दिले असून सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बँकांना नवीन शाखा उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचलेल्या नाहीत त्याबद्दल सरकारने बँकांना माहिती दिली असून सुमारे १५ हजार नवीन शाखा सुरू होण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षांपासून केंद्र सरकार वित्तीय सर्वसमावेशकतेला प्राधान्य देत आहे. त्यानुसार अद्याप बँकिंग सेवा न पोहचलेल्या ठिकाणांची माहिती सरकारने बँकांना सुपूर्द केली आहे. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचली नाही, अशा खेड्यांमध्ये १५ किलोमीटर परिघाच्या आत बँक शाखा असावी, असे सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या वर्षभरात एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या बँका १४ ते १५ हजार नवीन शाखा सुरु करतील, असे सूत्रांनी सांगितले आहे. शाखा विस्तारामध्ये