Home राज्य भाजप आमदारांच्या दोन बायकांमध्ये फ्रि-स्टाईल हाणामारी

भाजप आमदारांच्या दोन बायकांमध्ये फ्रि-स्टाईल हाणामारी

0
32

यवतमाळ प्रतिनिधी । पांढरकवडा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांनी भर रस्त्यावर एकमेकांना हाणामारी केल्याचा प्रकार काल घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पांढरकवडा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देतांनाही दुसर्‍या पत्नीसोबत गत एक वर्षापासून संसार थाटला आहे. यावरून त्यांच्या कुटुंबात आधीच धुसफुस सुरू आहे. यातच काल राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमात त्यांच्या दोन्ही सौभाग्यवती समोरासमोर आल्यानंतर ठिणगी पडली. या दोन्हींमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. याप्रसंगी तोडसाम यांची आई आणि पहिल्या पत्नीने दुसर्‍या बायकोला झोडपल्याची माहिती उपस्थितांनी दिली. उपस्थितांनी त्यांना आवरण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला. दरम्यान, प्रकरण हाताबाहेर गेल्याचे पाहून आमदार राजू तोडसाम यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेऊन पोलीस स्थानक गाठले. रात्री उशीरा दोन्ही बाजूंना समजावण्यात आल्याने पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यावरून मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound