जळगाव प्रतिनिधी । उभ्या टँकरवर धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास नशिराबाद शिवारात घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात आपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अनिलकुमार रामखिलावर शुक्ला (वय ३३) हे गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय येथे संगणक परिचालक असून दि.१२ रोजी काम आटोपून आपल्या दुचाकीने घराकडे जात असतांन राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील नशिराबाद गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कपुरी पेट्रोल पंपाजवळ उभा असलेल्या टँकरला त्यांनी धडक दिली. आपघात इतका भिषण होता की दुचाकीचे मोठे नुकसान होत अनिलकुमार यांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद करण्यात येवून मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात अला. मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवायिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.