डॉ. बिराजदार यांना निलंबित करा – संभाजी सेनेची मागणी

jalagon

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.बिराजदार यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी संभाजी सेनेचे कार्यकर्ते भगवान सोनवणे यांनी केली असून आज यासंदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिव्हील हॉस्पीटल येथे संभाजी सेना तर्फे सामाजिक उपक्रमांतर्गत रूग्णांना सर्वोतोपरी सहाय्य करीत असतात. रूग्ण सेवा करीत असतांना सिव्हील हॉस्पीटल येथे रूग्णांना होणाऱ्या अडी-अडचणी येथील गलथाण कारभार अस्वच्छता इत्यादी गोष्टीबाबत वरिष्ठांना तक्रारी करीत असतात. अशाच एका रूग्णास आर्थीक झळ पोहचण्यात येत असल्याबाबत (दि.११) रोजी एका रूग्णास एक महिन्यापासून विविध चाचण्या खाजगी प्रयोगशाळेतून सुटका करण्यात आली. तसेच त्यांना २० ते २५ हजाराचा नाहक भूर्दंड देण्यात आल्याबाबत वरिष्ठांना व व्हॉटसअॅप गृपला टाकण्यात आल्याचा राग येवून त्याच रात्री ११.०० वाजता डॉ.बिराजदार यांनी संभाजी सेनेचे कार्यकर्ते यांना मोबाईल वरून धमकी देवून खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणाची शहर पोलीस स्टेशन येथे भगवान सोनवणे यांनी दखलपात्र गुन्हयाची नोंद डॉ.बिराजदार यांच्या विरूध्द करण्यात आलेली आहे.

दरम्यान, डॉ.बिराजदार सिव्हील हॉस्पीटल येथे मनमानी कारभार करीत असून अनेक रूग्णांना खाजगी रूग्णालयात जाण्याचा सल्ला देवून त्यांची आर्थिक पिळवणुक करीत असतात. बऱ्याच वेळा ते शाहू नगर येथील एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टीस करीत असल्याने सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपस्थित राहत नसतात. वास्तविक ही बाब कायद्याविरूध्द असल्याने रूग्णांची हेळसांड होवून त्यांना जिवासही मुकावे लागते.

यासाठी डॉ. बिराजदारांबाबत अनेक विविध सामाजिक सेवा करणाऱ्या समाज सेवकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. पण वरिष्ठांकडून दुर्लक्ष करण्यात येते. तरी संबंधीत तक्रारीची दखल घेवून डॉ.बिराजदार यांना निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी संभाजी सेनेचे कार्यकर्ते भगवान सोनवणे यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/811976205942735/

Protected Content