Home Cities भुसावळ भुसावळच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दुर्गेश ठाकूर विजयी

भुसावळच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दुर्गेश ठाकूर विजयी

0
146


durgesh thkur bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । येथील प्रभाग क्रमांक २४-अ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दुर्गेश ठाकूर यांचा विजय झाला आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक २४ अ मधील एका जागेसाठी गुरुवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यात भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, भाजपतर्फे रेखा सुनील सोनवणे तर शिवसेनेतर्फे विक्की चव्हाण यांच्यात येथे लढत झाली. यात….यांनी बाजी मारली आहे.

प्रांताधिकारी कार्यालयात आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्गेश ठाकूर यांचा विजय झाला आहे. त्यांना २२९१ मते मिळाली. भाजपच्या रेखा सोनवणे यांना १४२९ तर शिवसेनेचे विक्की चव्हाण यांना अवघी ९० मते मिळाली. यामुळे दुर्गेश ठाकूर यांना ८६२ मतांचे मताधिक्य मिळून त्यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound