रावेर प्रतिनिधी । निंभोरासिम येथे दिवसांपूर्वीच (दि.7) रोजी दरड कोसळुन दोन जणांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मयत सवर्णे यांच्या कुटुंबाला आज (दि.9) भेट दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निंभोरासिम येथे मयत सवर्णे यांच्या कुटुंबाला भेट देऊन दहा हजाराची मदत केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री साहायता निधितून मदत करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिली.
तसेच यावेळी मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांनी जनशक्ती प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना अवैध वाळू वाहतुकीवर अकुंश ठेवण्यासाठी सूचना केल्या आहे तसेच लवकरच याभागाचे ठेके संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार आहे.