Home Cities जळगाव जळगावात राज्यातील पहिल्या योग विद्यालयास प्रारंभ

जळगावात राज्यातील पहिल्या योग विद्यालयास प्रारंभ

0
51

जळगाव प्रतिनिधी । शहरात योगाभ्यास आणि गुरुकुल पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून नव्या पूर्वप्राथमिक योग विद्यालयास प्रारंभ होत आहे. जून महिन्यापासून सुरु होत असलेल्या या आगळ्या-वेगळ्या अशा राज्यातल्या पहिल्याच विद्यालयासाठी आता प्रवेश सुरु झाले आहे.

बालयोगी इंटर नॅशनल योगा बेस स्कूल या नावाने हे विद्यालय शहरातील शिव कॉलोनी बस थांब्याजवळ असलेल्या भगीरथ कॉलोनीत सुरू करण्यात आले आहे. योगशिक्षक कुणाल महाजन यांनी आपले गेल्या काही दिवसांपासूनचे योग विद्यालयाचे स्वप्न यानिमिताने प्रत्यक्षात आणले आहे. त्यासाठी त्यांनी निर्धार योग व क्रीडा प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली असून त्या अंतर्गत हे विद्यालय सुरु केले आहे. पहिल्या वर्षी येथे प्ले-गृप व नर्सरीचे वर्ग सुरु केले जाणार असून जसे-जसे ही मुले वरच्या वर्गात जातील तसे-तसे पुढील वर्ग सुरु केले जाणार आहेत. तसेच आगामी तीन वर्षानंतर पहिली ते दहावी अशी नियमित शाळाही सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. या विद्यालयातील मुले मुख्य प्रवाहातील शिक्षणापासून वंचित अथवा मागे राहू नये म्हणून योगासोबत इतर नियमित विषयांचे शिक्षणही येथे दिले जाईल अशी अभ्यासक्रमाची रचना केली जाणार आहे.

मुलांमध्ये लहान वयापासूनच योगाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांना गुरुकुल पद्धतीप्रमाणे शिक्षण देऊन एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांना तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. मुलांना त्यांची दिनचर्या व आहाराबाबत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. मुलांमध्ये लहान वयापासूनच येणारे ताणताणाव, न्यूनगंड, वाईट सवयी, मोबाईल, कॉम्पुटर व अन्य बैठ्या खेळांचे आकर्षण, परीक्षांमध्ये अपयश आल्यास वाटणारी भीती, या व अशा विविध समस्यांवर योगाद्वारे उपचार आणि प्रशिक्षणही मुलांना बाल वयापासूनच या विद्यालयात दिले जाणार आहे. त्याचबरोबर पालकांनीही आपल्या पालक म्हणून जबाबदारकया व्यवस्थितरित्या पार पाडाव्या यासाठी विद्यालयाच्या माध्यमातून ‘उत्कृष्ट पालकत्व चळवळ’ ही राबविण्यात येणार असून त्यामध्ये पालकानाही प्रशिक्षित केले जाणार आहे.

यंदा विद्यालयाचा प्रारंभ होत असल्याने प्रवेशासाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी लवकरात लवकर विद्यालयात अथवा ९२०९२५०५५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून प्रवेश निश्‍चित करावा, असे आवाहन संस्थाचालक कुणाल महाजन यांनी केले आहे.

गुगल मॅप्सवरील लोकेशन


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound