Home Cities धुळे देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले, माझ्याकडे पुरावे : अनिल गोटे

देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले, माझ्याकडे पुरावे : अनिल गोटे

0
135

download
 

धुळे (प्रतिनिधी) फडणवीस सरकारने पाच वर्षांत महाराष्ट्र ओरबाडून काढला. मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केले आहे. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय, कागदपत्राशिवाय कधीच बोलत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा खळबळजनक आरोपही धुळे शहरातील भाजपाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी केला आहे.

गोटे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याइतकं भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आले नव्हते असे ते म्हणाले. तसेच मोपलवार यांच्याइतका भ्रष्ट माणूस जर देवेंद्र फडणवीस यांना चालत असेल तर काय बोलायचे ?काही सांगायची गरजच नाही. प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे याची यादी माझ्याकडे आहे,” असं सांगताना अनिल गोटे यांनी समृद्धी महामार्गातही घोटाळा झाला असल्याचा आरोप केला.

 


Protected Content

Play sound