Home Cities जळगाव जामठी येथे चुलीच्या आगीत महिला गंभीर जखमी

जामठी येथे चुलीच्या आगीत महिला गंभीर जखमी


fire

जळगाव प्रतिनिधी । चुलीवर पाणी तापविण्यासाठी ठेवत असतांना अचानक गाऊनला आगीने पेट घेतल्याने 55 वर्षीय महिला आगीत गंभीर जखमी झाल्या असून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, कल्पना गुलाबसिंग पावर (वय-55) रा. जामठी ता. बोदवड ह्या महिला आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास अंघोळीस पाणी तापविण्यासाठी ठेवले. त्यावेळी त्यांनी घातलेल्या गाऊनला आग लागली. गाऊनला लागलेल्याने आगीने त्या ओरडत होत्या. त्यावेळी गल्लीतील ग्रामस्थांनी धाव घेवून आग विझविली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. नातेवाईकांना तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. यात त्या 45 टक्के भाजल्या गेल्या आहेत.


Protected Content

Play sound