Home क्राईम जळगावात दोन गटात हाणामारी

जळगावात दोन गटात हाणामारी


जळगाव प्रतिनिधी । वाघनगर स्टॉपवर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गटात पूर्नवैमन्सायातून हाणामारी झाली. त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेमुळे वाघनगर स्टॉपवर धापवळ होवून नागरिकांमध्ये काही क्षणासाठी भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

हरिविठ्ठल नगर परिसरात हटकर व पाटील गटात अनेक वर्षापासून वाद असून अनेकदा वाद उफाळून आलेले आहे. त्यानुसार आज वाघ नगर स्टॉपवर सकाळी साडेदहाच्या सुमारास एका गटातील व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीच्या गाडीला कट लागल्यावरून वाद झाला. वादाचे स्वरुप हाणामारीत झाल्याने दोन गटात झटापटी झाल्या. त्यानंतर दोन्ही गटातील काही जणांनी मध्यस्थती करू वाद मिटवीला. परंतू अचानक झालेल्या या घटनेमुळे मात्र परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने स्टॉपजवळील दुकाने तसेच घरे नागरिकांनी पटापट बंद केल्याने घबराट निर्माण झाली होती. या घटनेची मात्र पोलिस ठाण्यात नोंद नसल्याचे समजते.


Protected Content

Play sound