नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नवनिर्वाचित काँग्रेसच्या मंत्र्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली. यावेळी खातेवाटपावर सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
यावेळी बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, असलम शेख, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, अशोक चव्हाण, के.सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, मल्लिकार्जुन खर्गे, सुनील केदार, के.सी. वेणूगोपाल यासारखे सर्व दिग्गज नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले. यावेळी या दिग्गज नेत्यांची खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसात दुरुस्ती झाल्यानंतर खातेवाटप होईल. काही जागा मर्यादित असल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र ती लवकरच दूर केली जाईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.