भुसावळ प्रतिनिधी । पती घरात नसताना चुलत दिराने वहीनीवर अतिप्रसंग करत विनयभंग कतर आत्महत्योस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीसह इतर तिघांना भुसावळ न्यायलयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी शंकर मधुकर पाटील रा धानोरी हे आपली पत्नी मयत कल्पना व मुलांसह राहत होते त्यांचे शेजारी त्यांचा चुलत भाऊ प्रविण भास्कर पाटील हा राहत होते. १३ एप्रील ०९ रोजी फिर्यादी हे त्यांचे शालक सोबत कुऱ्हे पानाचे या गावी गेलेले असताना, रात्री ३ ते ३.३०चे सुमारास आरोपी प्रविण भास्कर पाटील याने मयत ही तीचे घरात एकटी झोपलेली असताना तीचे घरात अनाधीकाराने घुसून तीची छेडखानी केली, तीचेवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला व तीला धमकी सुद्धा दिली व पळून गेला.
प्रविणची बहिण संगिता ज्ञानेश्वर काळे व तिचे पती ज्ञानेश्वर नथ्थू काळे रा. हरताळा आणि प्रविणची आई कमलाबाई भास्कर पाटील यांना दुसऱ्या दिवशी फिर्यादी शंकर पाटील यांनी प्रविण याला समजावून सांगण्यासाठी गेले असता उलट त्यांनी मयत कल्पना हीचे चारीत्र्यावर संशय घेऊन तीला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे तीने घरातुन निघून जाऊन गावाजवळील काशिनाथ आनंदा राणे यांचे विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. शंकर पाटील हे घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली असता तीचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी वरणगांव पोस्टेला आरोपी चुलत भाऊ प्रविण व त्यांची बहीण व मेहूणे व आई विरुद्ध त्यांनी मयत हीस विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गु.र.नं. ३३/०९ गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्यामधे सरकार तेर्फ फिर्यादी सह एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले त्यात मयतचे सासरे, दिराणी तसेच गावातील व्यक्ती सह पीएम करणारे वैधकीय अधीकारी, तपासाधिकारी पी एस आय सुनील मे ठे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदरच्या खटल्यात आरोपी प्रविण भास्कर पाटील रा. धानोरी, संगीता ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर नथ्थु काळे यांना दोषी ठरविण्यात आले असून त्यांना कलम ३०६ खाली ७ वर्षाच्या कैदेची शिक्षा व ५००० रू दंड तसेच दंड नं भरल्यास १ महीना कैद तसेच आ नं १ प्रविण यास विनयभंगाचे आरोपात दोषी आढळल्याने त्यासाठी तीन वर्ष कारावास व ३००० रु दंड व दंड न भरल्यास २० दिवसाच्या कैदेची शिक्षा तसेच त्यास पुन्हा कलम ४४८ खाली ६ महीणे कैद व कलम ५०६ खाली ३ वर्ष कारावास व ३००० रु दंडाची शिक्षा सुनावली. सदरच्या खटल्यात सरकार तर्फ सरकारी वकील म्हणून अॅड विजय खडसे यांना कामकाज पाहीले