धरणगाव नगराध्यक्ष निवडणूक : कुणाला मिळाली किती मते ?

nilesh s chaudhari

धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आज (दि.३०) झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी हे विजयी झाले आहेत. त्यांची खरी लढत भाजपाचे अधिकृत उमेदवार मधुकर बन्सी रोकडे यांच्याशी झाली. त्यात चौधरी यांनी ३९५२ मतांनी विजय प्राप्त केला.

 

या दोघांशिवाय आणखी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पण त्यापैकी कुणीही चार आकडी मते मिळवू शकला नाही. यावेळी मतमोजणीच्या पाच फेऱ्या झाल्या. पाचव्या फेरीअखेर निलेश चौधरी यांना विजयी घोषित करण्यात आले.

उमेदवारांना मिळालेली अंतिम मते :-
१) निलेश भागवत चौधरी (राष्ट्रवादी) ५३१ मते, २) निलेश सुरेश चौधरी (शिवसेना) १००१२, ३) महेंद्र सुभाष पाटील (अपक्ष) ८६९, ४) उमेश जानकीराम माळी (अपक्ष) ८२, ५) मधुकर बन्सी रोकडे (भाजपा) ६०६०, ६) संजय एकनाथ माळी (अपक्ष) ६५ आणि ७) हाजी शेख इब्राहीम अ. रसूल (अपक्ष) ३४४. याशिवाय वरीलपैकी कुणालाही मत न देण्याचा पर्याय अर्थात ‘नोटा’ यावरही ११३ मतदारांनी मत नोंदवले.

Protected Content