जळगाव, प्रतिनिधी | अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचा वधु-वर परीचय मेळावा नुकताच (दि.२५) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम वधुवर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. समाज मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मराठे यांनी आपल्या मनोगतात पुढील वर्षी (२०२०-२१) मध्ये सामुहिक विवाह सोहळा घ्यायचा प्रयत्न असेल, असे सांगितले. मेळाव्यात शंभर पेक्षा जास्त मुला-मुलांनी आपला परिचय करून दिला.
अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज मंडळाच्या सर्व कार्यकारिणी संचालक बांधवांच्या सहकार्याने व सोशल मिडीयाच्या माध्यमातून व समाजातील हितचिंतक यांच्या माध्यमातून सुमारे ७०० परिचय पत्रे संकलीत करून, परीचय पुस्तिका तयार करून ती स्वागत मुल्य म्हणजे फक्त ५० त उपलब्ध करून दिली आहे.
मेळाव्यास माजी अध्यक्ष माधवराव निळकंठ पाटील, भानुदास पाटील, अँड.सोनु सोनवणे, तसेच माजी जिल्हा शिक्षण अधिकारी निळकंठ गायकवाड, देविदास आनंदा पाटील माजी उपसभापती, दिलीप मराठे धरणगाव, विष्णु पाटील खरगोन, पावबा मराठे, किसन जयराम मराठे, निळकंठ शंकर पाटील, व सर्व आजी-माजी संचालक तसेच महिला व समाज बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील सुमारे दोन हजारांवर समाज बांधव उपस्थित होते.
ज्या उपवर वधुवरांनी आपला परीचय करून दिला, अशा सर्व मुला-मुलींना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे विविध क्रीडा क्षेत्रातील विजयी विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. मेळाव्याचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे समाजाचे सचिव पी.के.पाटील तसेच उत्कृष्ट भोजन व्यवस्था केल्यामुळे उपाध्यक्ष अवधूत मराठे तसेच परिचय पुस्तिकेची संपादकीय जबाबदारी सांभाळून सर्वोत्तम पुस्तिका बनवल्याबद्दल संचालक चिंतामण बाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
वधुवर परिचय मेळावा यशस्वी होण्यासाठी जळगाव मंडळ तसेच युवा मंडळ व खासकरून महिला मंडळाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.हेमलता मराठे यांनी केले. तर आभार संचालक दिनकर पाटील यांनी मानले. मेळावा शांततेत व उत्साहात संपन्न झाल्याने सुरत महानगर पालिकेचे नगरसेवक व बांधकाम सभापती सोमनाथ रघुनाथ मराठे यांनी सर्व उपस्थित समाजातील मान्यवरांचे आभार मानले.