जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठ येथील ओम साई मित्र मंडळ यांच्यातर्फे जळगाव शहरापासून ते शिर्डीपर्यंत साईबाबा पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पालखी पदयात्रेला आज सकाळी बळीराम येथून सुरुवात करण्यात आली.
यावेळी ओम साई मित्र मंडळातर्फे आयोजित पदयात्रेत शेतकरी अत्महत्या रोखण्यासाठी आणि डेंग्यू बाबज जनजागृती करण्यात येत नाही. यासाठी पदयात्रेसोबत अनेक भाविकांची उपस्थिती होती. 28 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत या पदयात्रेचा प्रवास असून 4 डिसेंबर रोजी पालखी चा समारोप होणार आहे.
पालखीचा मुक्काम याप्रमाणे
28 डिसेंबर रोजी सकाळी पालखी पदयात्रेस सुरूवात, रात्री पाळधी ता.धरणगाव येथे मुक्काम, 29 डिसेंबर रोजी कासोदा ता.एरंडोल, 30 डिसेंबर रोजी कजगाव ता. भडगाव, 31 डिसेंबर रोजी तळेगाव ता.चाळीसगाव, 1 जानेवारी 2020 रोजी तांदलवाडी ता.जि.नशिक, 2 जानेवारी 2020 रोजी नगरसुल ता.येवला, नाशिक, 3 जानेवारी 2020 रोजी येवला आणि 4 जानेवारी 2020 रोजी कोपरगाव येथे प्रस्थान होणार आहे.
पालखी यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष रविंद्र हसवाल, सागर मनियार, किशोर देशमुख, राजू पाटील, गजानन बोरकर, आशीष पाटील, जगदीश गुरव, विजय झंवर यांच्यासह आदी भाविक परीश्रम घेत आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या आवारात असलेल्या सिध्दीविनायक मंदीरात पालखीने विसावा घेतला. यावेळी सिव्हील बॉईज क्रिकेट क्लब व मित्र परीवार यांच्यावतीने भाविकांना वडा पाव आणि केळीचे वाटप करण्यात आले. यानंतर पालखी पाळधी येथे रवाना झाली. पाळधी येथे पालखी पदयात्रेचा मुक्काम राहणार आहे. उद्या सकाळी कासोद्याकडे रवाना होणार आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/754845185035552/