नवी दिल्ली वृत्तसंस्था । सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि एनआरसीवर सुरु असलेल्या वादादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. सीएए आणि एनआरसी हा गरिबांवर हल्ला असून हा नागरिकता टॅक्स (कर) असल्याचा आरोप त्यांनी केला.
छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवमध्ये सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, पूर्वी जग म्हणत होते की, भारत आणि चीन एका वेगाने पुढे जात आहे. पण आता जगाला भारतात हिंसाचार दिसत आहे. रस्त्यावर महिला स्वतःला असुरक्षित समजत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. एनसीआर असो किंवा एनपीआर, दोन्ही गरिंबावरील टॅक्स आहे. नोटबंदीवेळी गरिंबांवर टॅक्स होता. हे संपूर्णपणे गरिबांवर आक्रमण आहे. लोकांना नोटबंदीप्रमाणेच रांगते उभा केले जाणार आहे. देशाची वेळ वाया जाणार आहे.