Home Cities जळगाव भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांची ना.जगवानी यांच्या घरी सदिच्छा भेट

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांची ना.जगवानी यांच्या घरी सदिच्छा भेट


जळगाव (प्रतिनिधी) शहरात भाजपच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी रविवारी दुपारी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष ना.डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
डॉ.गुरुमुख जगवानी यांनी उपाध्यक्ष श्याम जाजू यांचे स्वागत केले. डॉ.जगवानी यांना नुकतेच राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्याने जाजू यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या घरी बसत भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी बराचवेळ चर्चा केली. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने देखील त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात असलेली सध्यास्थिती त्यांनी डॉ.जगवानी यांच्याकडून जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound