Home Cities धरणगाव उद्धव ठाकरे जे बोलता ते करतातच, शेतकरी कर्जमाफी याचा पुरावा : गुलाबराव...

उद्धव ठाकरे जे बोलता ते करतातच, शेतकरी कर्जमाफी याचा पुरावा : गुलाबराव वाघ


gulabrao wagh
 

धरणगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंतची कर्जमाफी म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे बोलता ते करतातच,याचाच पुरावा असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. ते आज शहरात कर्जमाफीबद्दल शिवसैनिकांनी केलेल्या जल्लोषानंतर बोलत होते.

 

आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महाआघाडी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांचे शेतकऱ्याचे दोन लाख पर्यंतचे कर्जमाफ केल्याबद्दल मोठ्या उत्साहात फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे बोलता ते करतातच. यावरून हे सिद्ध होते असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष अंजलीताई विसावे, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, पी एम पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे पालिका पोटनिवडणुकीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार निलेश चौधरी, काँग्रेसचे शहर प्रमुख राजेंद्र न्हायदे, न पा गटनेते पप्पू भावे, चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, जीवन आप्पा बयस, नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन काँग्रेसचे चंदन पाटील, जगदीश चव्हाण, रामचंद्र महाजन, संभाजी बिग्रेडचे गोपाल पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound