जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ ४ जानेवारी रोजी होणार असून याला अमेरिकास्थित सुनील देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २८वा पदवी प्रदान समारंभ ४ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार अाहे. यंदा ९४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभास अमेरिका येथील सुनील देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे़. यंदा तब्बल ८ विद्यार्थ्यांनी दुहेरी तर एका विद्यार्थिनीने तीन सुवर्णपदक मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे.
या वेळी कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दरम्यान, पदवी प्रदान कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. यंदाही सर्वाधिक सुवर्णपदक हे मुलींनी पटकावले आहे.
असे आहेत सुवर्णपदक विजेते
विविध महाविद्यालयातील ९४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात येणार असून, त्यामध्ये साकेत अशोककुमार भाला (एमसीए), गोपाल भिकन धनगर (एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स), पूजा बबन हजारे (एम.एस्सी कॉम्प्युटर), मोना मुकेश मनकाणी (एम.एस्सी फिजिक्स), प्रज्ञा गौतम केदार (एम.एस्सी पर्यावरणशास्त्र), माधवी योगेंद्र द्विवेदी (एम.एस्सी गणित), गौरव गणेश सोनवणे (एम.एस्सी पॉलिमर केमिस्ट्री), राहुल दगा पाटील (एम.एस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्री), राहुल दगा पाटील (एम.एस्सी केमिस्ट्री), रोहन नारायण चौधरी (एम.एस्सी केमिस्ट्री, सर्व शाखा), रोहन नारायण चौधरी (एम.एस्सी केमिस्ट्री), फातेमा झुकीद्दीन असिडवाला (एम.एस्सी बायोटेक्नॉलॉजी), मयूरी प्रकाश चांदवाणी (एम.एस्सी मायक्रोबायोलॉजी), विनिता कृष्णस्नेही तिवारी (एम.एस्सी बायोकेमिस्ट्री), हितेश सोमनाथ महाले (एम.एस्सी पेस्टिसाइडस् व अॅग्रोकेमिक्ल्स), रिया राजेंद्र जैन (एम.एस्सी स्टॅटिस्टिक्स इंडिस्टिअल स्टॅटिस्टिक्स), दीपाली तुकाराम पाटील (एम.एस्सी आयटी), संघरत्ना युवराज तायडे (एम.एस्सी बॉटनी), दीपश्री प्रकाश अहिरराव (एम.एस्सी फिजिक्स मटेरियल सायन्स), कौस्तुभ रवींद्र नाईक (एम.एस्सी फिजिक्स एनर्जी स्टडीज), बटाबाई श्यामसिंग जाधव (एम.एस./एम.एस्सी भूगोलशास्त्र), गणेश राजेंद्र पाटील (एम.एस्सी इंडस्ट्रियल केमिस्ट्री), शेख सामिया इलियास (बी़एस्सी पदार्थ विज्ञान), भावना प्रवीण खैरनार (बीएस्सी विषय), भावना प्रवीण खैरनार (बीएस्सी संख्याशास्त्र), प्रवीण शत्रुघ्न पाटील (बीएस्सी रसायनशास्त्र), यास्मिन मेहबूब तांबोळी (बीएस्सी रसायनशास्त्र), अंबाली दिनकर खैरनार (बीएस्सी प्राणिशास्त्र), निकिता नाना पवार (बीएस्सी वनस्पती), कुणाल अर्जुन मानकर (बीएस्सी मायक्राेबायाेलॉजी), मानसी राजेंद्र जोशी (बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी), वैभवी विजय भामरे (बीएस्सी बायोकेमिस्ट्री), राहुल कैलास पाटील (बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स), राजश्री प्रवीण निळे (बीएस्सी गणित), अमित सुनील चौधरी (बीएस्सी भूगोल), शारदा दिलीप झोपे (एम.फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री), प्रशांत दिलीपचंद जैन (एम.फार्मसी फार्माकॉग्नॉसी), जाहिद अन्वर अन्सारी, शाहीद अहमद (एम.फार्मसी क्वालिटी अॅश्युरन्स), हितेश संजय रावतोळे (बी. फार्मसी), स्नेहा भिका चौधरी (बी.फार्मसी), ज्ञानदा दिवाकर चौधरी (बी.टेक केमिकल इंजिनिअरिंग), उत्कर्षा राजेंद्र बांगडे (बी.टेक आॅइल, फॅट्स अॅण्ड वॅक्सेस), लखन राजकुमार जयसिंघानी (बी.टेक फूडस्), शुभम कैलास चौधरी (बी.टेक प्लास्टिक), सुशील विश्वनाथ चौधरी (बी.टेक पेंट्स), सूर्यकांता गोपाळराव पाटील (बी.ई. कॉम्प्युटर), सूर्यकांत गोपाल पाटील (बी.ई), पूजाबेन प्रल्हाद चौधरी (बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स), मरियम शोएब लेहेरी (बी.ई बायोटेक्नॉलॉजी), मयूरी विजयराव येलने (बी.ई. केमिकल), पूर्वा अनिल बोरसे (बी.ई. सिव्हिल), अनघा लीलाधर चौधरी (बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन), जयेश श्यामराव चौधरी (बी.ई. मेकॅनिकल), मयूर अरविंद गोहील (बी.ई. अाॅटोमोबाइल), हर्षदा विक्रम जाधव (बी.ई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), रामचंद्र सुधाकर नेमाडे (बी.ई. इलेक्ट्रिकल), कल्याणी राजेंद्र सुर्वे (एमबीए), मेघना रूपनारायण राठी (एमबीए फायनान्स), लक्ष्मीकांत युवराज सोनवणे (एम.कॉम), धनश्री पुंजाराम सरळकर (एम.कॉम अॅडव्हान्स अकौंटन्सी), अंकिता शंकरराव कणसे (बी.कॉम), नेहा राजेंद्र पाटील (बी.कॉम अकौंटन्सी), मीनल किशोर चौधरी (बी.कॉम इन्कम टॅक्स), शिबा अख्तर खान (एम.एस. इंग्रजी), योगेश्वर ज्ञानेश्वर पाटील (एम.एस. इंग्रजी), प्रमोद मनोहर राऊत (एम.ए. मराठी), भावना भीमराज संकपाल (एम.एस. मराठी), तेजस्विनी दिनकरराव पाटील (एम.ए हिंदी), किशोरी संतोष गव्हाळे (एम.एस. संस्कृत), उत्कर्षा गोविंद सोनवणे (एम.एस. समाजशास्त्र), शुभम राजू वाल्हे (एम.ए. अर्थशास्त्र), पूजा उद्धव पाटील (एम.एस. इतिहास), भाविका सुपडू (बी.ए), भाविका सुपडू पाटील (बी.ए.अर्थशास्त्र), कोकिळा लालचंद खैरनार (बी.ए.मराठी), हीना शेख शकील (बी.ए. उर्दू), जान्हवी गोविंद देऊळगावकर (बी.ए. संस्कृत), चेतना चंद्रकांत चौधरी (बी.ए. भूगोल), शुभम रवींद्र राठोड (बी.ए. इतिहास), सारिका राजेंद्र शितोळे (बी.ए. इंग्रजी), पराग रमाकांत कुकडे (एल.एल.एम), प्रतीक्षा बापूराव मराठे (विधी अभ्यासक्रम), प्रिया वाशुराम मोटवाणी (३ वर्षीय विधी अभ्यासक्रम), प्रिया वाशुराम मोटवाणी (एलएलबी), प्रिया वाशुराम मोटवाणी (३ वर्षीय विधी अभ्यासक्रम सिव्हिल प्रोसिजर कोड अॅण्ड लिमिटेशन अॅक्ट विषय), दुर्वेश राजेश मराठे (विधी अभ्यासक्रम जुना/नवीन), सावन अनिल वळवी (एम.ए. मासकम्युनिकेशन), उमेश मोतीराम वाघ (एम.ए. आंबेडकर विचारधारा), प्रिया पुरुषोत्तम पालसोदकर (एम.ए. संगीत), शदमा फिरदोस नाजीम खान (एम.एड्.), आनंदराव नाना पदमार (बी.एड. जनरल).
तिन्ही जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांनी दोन सुवर्णपदक मिळवले आहे. तर केसीईच्या एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रिया वाशुराम मोटवाणी या विद्यार्थिनीने तीन सुवर्णपदक मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.