मुंबई प्रतिनिधी । पंजाब नॅशनल बँक प्रकरणी सीबीआयकडून नवे पुरवणी आरोपपत्र मुंबई विशेष सीबीआय न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रात प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी यांचा भाऊ नेहलसह अन्य पाच जणांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात कंपनीचे निलंबित अधिकारी संजय प्रसाद, अमित मागिया, संदिप मिस्त्री आणि मिहिर भन्साळी यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. पुरावे नष्ट करणे, इतर साक्षीदारांना धमकावणे, असे नवे आरोप या पुरवणी आरोपपत्रामध्ये ठेवण्यात आले आहेत. सीबीआयने न्यायमूर्ती वीसी बर्दे यांच्या खंडपीठासमोर आरोप पत्र दाखल करत असे म्हटले आहे की, भंसाली, मिस्री आणि नेहल मोदी हे देशाबाहेर राहत आहेत. त्यामुळे घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या विरोधात समन्स जाहीर करावे असे सांगितले आहे. नव्या आरोप पत्रात साक्ष नष्ट करणे आणि साक्षीदारांना धमकावणे हे आरोप लावले आहेत.
नीरव मोदी आणि त्याचा साथीदार मेहुल चोक्सी याने काही बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने 13,500 कोटी रुपयांचा पीएनबी बँकेत घोटाळा केला. त्यानंतर सीबीआय आणि इडी या प्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचा तपास करत आहेत.आयकर विभागाने फेब्रुवारी 2018 पूर्वीच आयकर खात्याने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याबाबत एक अहवाला तयार केला होता. हा अहवाल तब्बल 10 हजार पानांचा होता. मात्र, आयकर विभागाने त्यांच्याकडे असलेली ही महत्त्वपूर्ण माहिती प्रादेशिक आर्थिक गुप्तचर परिषदेलाही कळवली नाही. अखेर हा घोटाळा होण्यापूर्वी काही काळ आगोदर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी भारताबाहेर पळाले. मोदी आणि चोक्सी ही जोडगोळी जानेवारी 2018च्या जानेवारीमध्ये भारताबाहेर पळाली.