Home Cities धरणगाव धरणगाव पालिका पोटनिवडणूक : शिवसेना व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठक स्थळात बदल

धरणगाव पालिका पोटनिवडणूक : शिवसेना व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठक स्थळात बदल


shivsena and congress

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील शाखा प्रमुख शिवसेना व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी विद्यमान नगरसेवक व माजी नगरसेवक यांची आज (दि.२०) रोजी रात्री ७:०० वाजता होणाऱ्या तातडीच्या बैठक स्थळात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता ही बैठक आता जी.एस.लॉन्स मातोश्री नगर जवळ येथे होणार आहे.

 

या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक डी.जी.पाटील, प्रदेश सचिव राष्ट्रीय काँग्रेस गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हा प्रमुख सी.के.पाटील, चौधरी, नगराध्यक्ष पी.एम.पाटील,  उपजिल्हाप्रमुख शिवसेना या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सर्व नगरसेवक, शिवसेना शाखा, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना, अल्पसंख्याक सेना, पदाधिकारी व शिवसैनिक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी जास्ती-जास्त संख्येने उपस्थित राहावे, तसेच सर्व पदाधिकारी यांनी आपल्या परिसरातील शिवसैनिक व कॉग्रेसचे पदाधिकारी यांना मिटींगविषयी फोन व तोंडी निरोप द्यावा, असे आवाहन शहर प्रमुख राजेंद्र महाजन, युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन , तालुका प्रमुख कॉग्रेस रतीलाल चौधरी आणि शहर प्रमुख काँग्रेस राजेंद्र न्हायदे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound