दिमाखदार विजयानंतर विंडीजच्या आनंदात आयसीसीने टाकला मिठाचा खडा

team

चेन्नई वृत्तसंस्था । भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात कॅरेबियन ताफ्याने विराट सेनेला पराभवाचा दणका दिला. या विजयासह विंडीजने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सलामीच्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवणाऱ्या विंडीजच्या आनंदात आयसीसीने मिठाचा खडा टाकला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनाच्या ८० टक्के दंड केला आहे. चेन्नईत भारत विरुद्ध झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने ८ गडी राखून शानदार विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचे पारडे जड होते. भारताने प्रथम फलंदाजी करत २८८ अशी समाधानकारक धावसंख्या उभी केली होती. पण हेट-मायर आणि होप यांची शतकी खेळीने वेस्ट इंडिजने सहज विजय मिळवला. या विजयानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाचे सर्व जण कौतुक करत आहेत. मात्र खेळाडू आणि संघातील अन्य स्टाफसाठीची असलेल्या आचारसंहित २.२२ नुसार प्रत्येक संघाला विशिष्ठ वेळेत षटके टाकायची असतात. या निर्धारित वेळेत जर षटक टाकली गेली नाहीत तर प्रत्येक ओव्हर २० टक्के रक्कम दंड म्हणून केला जातो. वेस्ट इंडिजच्या संघाल देखील याच नियामाचा फटका बसला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात संधगतीने षटके टाकल्याबद्दल संघातील प्रत्येक खेळाडूला ८० टक्के दंड करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांच्या मानधनातून घेतली जाणार आहे.

Protected Content