मुंबई (वृत्तसंस्था) प्रविण दरेकर यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचं लक्ष होते. सर्वात आधी या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत होते. पण, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या प्रवीण दरेकर यांची वर्णी लागलेली आहे. या यादीत भाजपचे प्रदेश महामंत्री सुजितसिंह ठाकूर यांच्याही नावाची जोरदार चर्चा होती. दरम्यान, भाजपचे मुख्य प्रतोद म्हणून सुजितसिंह ठाकूर यांची निवड झाली, तर भाई गिरकर यांची उपनेतेपदी निवड झाली आहे. दरम्यान, या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर यांचे नाव कालपासून आघाडीवर होते. पण अखेरच्या क्षणी प्रविण दरेकर यांनी बाजी मारली.